Blog Archives

आपली वेबसाइट मराठी किंवा स्थानिक भाषेत का हवी ?


भारतात इंग्लंड पेक्षा जास्त लोकांना इंग्लिश बोलता येत. तरी सुद्धा आपल्या देशात इंग्लिश न येनारायांची संख्या त्याही पेक्षा  जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी कि आपली वेबसाईट हि कोणा करता बनवली आहे हे सुद्धा भागायला हव (टार्गेट मार्केट). जर आपल्या व्यवसायाशी निगडीत लोकांची संख्या स्थानिक भाषा बोलणाऱ्यांची असेल तर आपली वेबसाईट सुद्धा त्या भाषेतच हवी जेणेकरून ती सर्व लोकांपर्यंत पोहचेल आणि आपले प्रोडक्ट आणि सेर्विसिस ची माहिती सगळ्यांना सहज रीतीने कळेल आणि आज ते सहज शक्य आहे. फोन्ट नाही आहे म्हणून वेबसाईट दुसऱ्यांच्या कॉम्पुटर वर व्यवस्थित दिसत नाही हा प्राशन सुटला आहे. तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये युनिकोड फोन्ट वापर. “मंगल, Arial Unicode MS” हे फोन्ट वापरा. युनिकोड फोन्ट हे जगातल्या कोणत्याही कॉम्पुटर वर जसे आहे तसेच दिसतात. त्याच्यामुळे सगळ्या कॉम्पुटर वर हा फोन्ट असण्याची गरज नाही.

GOOGLE IME हे ट्रान्सलिटरेशान टूल आहे ज्याच्याद्वारे आपण सहज सोप्या पाधतिने मराठी किंवा इंग्लिश मध्ये लिहू शकतो आणि हे आपण गुगल, याहू, बिंग आणि अश्याप्रकारच्या सगळ्या सर्च इंगीन वर वापरून शोधू शकतो. गुगल आयामी सारखे भरपूर ट्रांसलिटरेशान टूल उपलब्ध आहेत. आणि अश्याप्रकारे इंग्लिश ची इंटरनेटवरची मक्तेदारी कमी होणार आहे आणि याचा फायदा इंग्रजी न येणाऱ्या लोकांना होणार आहे.

वरील साग्ल्याबाबी लक्षात घेतल्या तर आपण आपली वेबसाईट हि दोन्ही भाषेत म्हणजे इंग्रजी आणि मराठी/हिंदी मध्ये ठेवावी जेणेकरून आपण आपली वेबसाईट सगळ्या स्तरातील लोकांपर्यंत पोहचूशकू आणि आपण आपला व्यवसाय अजून उंचावर नेऊ आणि अधिक चांगल्या प्रकारे तिचे मार्केटिंग करू शकू.

Advertisements
%d bloggers like this: